यवतमाळ ब्लड डोनर

डॉ भाऊसाहेब नांदुरकर कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग अँण्ड टेक्नॉलॉजी,यवतमाळ यांच्या अनुसंघाने "यवतमाळ ब्लड डोनर " ची स्थापना करण्यात आली आहे."जीवनाच्या ज्योतीला आहे प्रकाशाची गरज,
रक्तदान केल्याने रक्त कधी नाही सरत ,
एकदा विझली प्राणज्योत तर ती लावता येत नाही परत,
म्हणून म्हणतो मित्रहो रक्तदान केल्याने रक्त कधी नाही सरत.......!!!"

रक्तदात्यांसाठी काही सुचना

१) रक्तदात्याचे वय कमीत कमी १८ ते ६० वर्ष असावे.
२) रक्तदात्याचे वजन ५० कि. पेक्षा अधिक असावे.
३) रक्तदात्याच्या शरिरामधील हिमोग्लोबीनचे प्रमाण १२.५ पेक्षा जास्त असावे.
४) महिला रक्तदात्यांसाठी दोन रक्तदानामध्ये कमीत कमी १२० आणि पुरुष रक्तदात्यांसाठी कमीत कमी ९० दिवसांचा फरक असावा.
५) रिकाम्या पोटी रक्तदान करू नये.

रक्तदानाचे फायदे

१) शरिरात रक्त प्रवाह सुरळीत चालु राहतो.
२) रक्तदान केल्याने हृदयाचे विकार आणि कर्करोग होण्याचे प्रमाण कमी होते.
३) शरिरातील वाढलेले लोहाचे प्रमाण मर्यादित राहते.
४) नियमित रक्तदान केल्याने शरिरातील चरबी (fats) कमी होते.
५) एवढेच नव्हे तर स्वतः पेक्षा इतरांना मदत करण्यामध्ये जे समाधान मिळते, ते जगामध्ये कितीही संपत्ती देऊन न मिळणारे समाधान आपणास मिळू शकते .